MAHATMA GANDHI MISSION

Krishi Vigyan Kendra

(Indian Council of Agricultural Research, New Delhi)
Gandheli, Tq. Dist. Aurangabad (M.S.) 431007
Tel.: 07028167090, Email: mgmkvk@gmail.com, Website: www.mgmkvk.com

कृषि सल्ला


 1. मराठवाड्यामध्ये सोयाबीन पिकावर २ % पोटॅशिअमनायट्रेटची फवारणी करावी. त्यामुळे सोयाबीन पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढू शकते.

 2. सोयाबीन पिकावरील स्पोडोप्टेरा अळीच्या बदोबस्तासाठी  क्लोरोपायरीफॉस २० %, २०  मिली १० लिटर किंवा सायपरमेथ्रीन २५ %, ४ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

 3. सोयाबीन वरील चक्री भुंगाच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४०%, २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 4. फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आलेल्या सोयाबीन पिकावर २ % युरीयाची फवारणी करावी.

 5. सोयाबीन पिकावर पाने खाण्या-या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० %, २० मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ %, ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारावे.

 6. कापुस पिकामध्ये लावलेले फेरोमन सापळ्याचे ल्यूर ४० दिवसांनी बदलावे. तसेच पिकावर  ५ % निबोंळी अर्कांची फवारणी करावी.

 7. कापसावरील मर रोग लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया +१.५ किलो पालाश  १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मिली प्रत्येक रोगग्रस्त झाडांना द्यावे. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ किलो DAP १०० लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण १५० ते २०० मिली झाडाच्या बुध्यांजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.

 8. कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी थायडीकार्ब ७५ डल्ब्यू पी २० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २० ईसी २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

 9. कापसावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एस.सी. ३.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 10. कापसावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५ % निबोंळी अर्क किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल. २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 11. पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने पिकांवर निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असुन नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% प्रवाही ४ मिली किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ %, ०.५ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.

 12. ऊस पिकावरील हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ०.३ % दाणेदार ३३ किलो प्रति हेक्टर पसरावे.

 13. बाजरी वरील केवडा रोग नियंत्रणासाठी मेटालॅक्झील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 14. ज्वारी पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियत्रंणासाठी कार्बोफ्युरॉन  ३ %, ८ किलो प्रति एकर जमिनीत टाकावे.

 15. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे. तेथे शक्य असल्यास पिकांना सरंक्षित पाणी द्यावे.

 16. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला आहे त्यांनी पिक विमा कंपनीस कळवावे.

 17. रासायनिक किटकनाशकाची फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी.


KVK Jurisdictional Area in Aurangabad District

Aurangabad District map

MGM Krishi Vigyan Kendra

Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad, under the administrative control of Mahatma Gandhi Mission, Aurangabad started it’s functioning in the year 2011, with the financial support from the Indian Council of Agricultural Research, New Delhi.

Krishi Vigyan Kendra is a planned project of Indian Council of Agricultural Research, New Delhi for transfer of agricultural technology to the farming community.


Adopted Villages of MGM Krishi Vigyan Kendra (KVK)

Out of the four adopted tahsils (Kannad, Khultabad,Gangapur and Vaijapur), MGM KVK has started its task of transferring technologies for the farmers in the following villages.

Sr.No. Name of the village Taluka
1 Jalgaon Ghat Kannad
2 Vaispur Kannad
3 Takli (L) Kannad
4 Takle (Rajerai) Khultabad
5 Kanakshil Khultabad
6 Ladgaon Vaijapur

Aurangabad District has Nine Tahsils, out of which Gangapur, Vaijapur, Khultabad and Kannad are the operational areas allotted by ICAR, New Delhi to MGM Krishi Vigyan Kendra.